गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले जेरबंद

पुणे : गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिताफीने पकडून दोघांकडून ४ किलो ८०१ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे.
नितीन भाऊसाहेब गोपाळ (वय २० ) आणि लकी छोटु पवार (वय १९, दोघे रा. साखरी रोड, धुळे) यांना या प्रकरणी अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रोडवरील सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालय परिसरात पेट्रोलिंग करत असताना महाविद्यालयाच्या गेटसमोर दोन इसम संशयस्पदरित्या थांबल्याचे निदर्शनास आले. त्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ९६ हजार २० रुपयांचा ४ किलो ८०१ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदा विक्रीसाठी आणल्याचा निदर्शनास आला, तसेच त्यांचाकडे दोन मोबाईल असा एकूण १ लाख १६ हजार २० रुपयांचा माल आढळून आला. दोघेही मुळचे धुळे जिल्ह्यातील असून त्यांच्या विरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी हा गांजा कोठून आणला याचा पोलीस तपास घेत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सिंहगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, ज्ञानेश्वर घोरपडे, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे, उदमले, खुटवड यांनी केली.
पोलिस आयुक्त आमितेश कुमार तसेच पोलिस सह आयुक्तरंजनकुमार शर्मा यांनी पुणे शहरातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी तसेच अमली पदार्थ तस्करांची माहिती काढून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.