पाक्षिक मूकनायकचा वर्धापनदिन संपन्न

बारामती : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात सुरु केलेल्या पाक्षिक मूकनायक या पाक्षिकाला 105 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने बारामतीत त्या पाक्षिकाचा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता.
बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाक्षिक मुकनायकास उजाळा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बारामती शहरातील आंबेडकरी अनुयायी यांनी अतिशय उत्साहात मनोगते व्यक्त करत त्या बद्दल आपली मते मांडली. तर मुकानायाकाच्या माध्यमातून शोषित नागरिकांच्या व्यथा आणि बहुसंख्य असलेल्या नागरिकांचे शोषण करणारांचा समाचार घेण्याचे काम झाल्याचे अनेकांच्या वतीने व्यक्त करण्यात आले. माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, संतोष काकडे, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अनिकेत मोहिते, सुमित साबळे, सोमनाथ रणदिवे, गणेश भोसले, तैनूर शेख, भास्कर दामोदरे, सुनील चव्हाण, चंद्रकांत खरात, आनंद जाधव, यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमास सुरुवात केली.
त्या नंतर उपस्थित आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मुकनायकावर्ती भाष्य करत वातावरण दनाणून सोडले. सुमित साबळे, प्रा. सरतापे, पुण्यशील लोंढे,जेष्ठ कार्यकर्ते यशपाल भोसले, लखन मिसाळ, तैनूर शेख, अनिकेत मोहिते, नवनाथ बल्लाळ आदी भीम सैनिकांनी मुकनायकास उजाळा देत मनोगते व्यक्त केली.
विधायक जयंती उत्सवास पंचवीस हजारांचे बक्षीस
आगामी येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कालावधीत जे मंडळ, कार्यकर्ते आणि भीमसैनिक डीजेमुक्त, विधायक उपक्रम आणि प्रबोधनपर जयंती उत्सव साजरा करतील त्यांना उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांच्या कडून पंचवीस हजारांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती बल्लाळ यांनी दिली.