किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांनी काढला कोयता
बारामती : एकाच गावातील अल्पवयीन मुलांनी एकमेकांकडे पाहण्यावरून बाचाबाची झाली,ती भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या इसमावर थेट कोयता काढण्यापर्यंत गेले आणि थरकाप उडविणारी अल्पवयीन मुलांची भांडणे झाली या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात सात अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविसार हाकीकत अशी की मौजे पणदरे येथे नवमहाराष्ट्र विदयालय कनिष्ट महाविद्यालयाच्या गेटच्या आत कही अल्पवयीन मुलांची भांडणे सुरु असल्याने ती मिटविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरच कोयत्याने हल्ला चढविला, झालेली भांडणे मिटविण्यासाठी पणदरे येथील सुतगिरणी येथे एकत्र येण्याचे ठरले नियोजित मिटवा मिटवी सुरु असताना त्याचे रुपांतर पुन्हा भांडणात झाले त्यात अल्पवयीन आरोपींनी चक्क कोयता काढण्यापर्यंत गेले आणि सपासप कोयत्याचे वार सुरु झाले दाक्षिनात्य चित्रपटातील थरकाप उडविणारी दृश्य पाहिल्यासारखी भांडणे चक्क अल्पवयीन मुलांमध्ये झाली. यात ज्यांनी ही भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला त्यांचेवरच त्या मुलांनी कोयत्याचे वार केले या प्रकरणी सात अल्पवयीन मुलांवर माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत तर अटक केलेल्या तीन आरोपींना बाल न्यायालय पुण्याला रवाना केले आहे. अधिक तपास अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत
