आई प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम ….प्रतिभा शिंदे

बारामती : दरवर्षी आई प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त 100 गरजू महिला भगिनींना साडीवाटप 100 जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मिठाईवाटप हा स्तुत्य उपक्रम असल्याचे नायब तहसीलदार प्रतिभा शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अध्यक्ष एस. एन. जगताप, बारामती शहर काँग्रेस आयचे अध्यक्ष, अशोकराव इंगुले , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष राजेंद्र काटे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस अमित तावरे, पत्रकारतैनूर शेख, प्रमोद ठोंबरे, दीपक पडकर, बानपाचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, शहाजी काळे, गौतम साबळे, वीरधवल गाडे, शुभम अहिवळे, इरफान शेख, नवनाथ मलगुंडे, किरण चौधर, राहुल जाधव, अमर मुलानी, अजिंक्य वाघमोडे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे शिंदे म्हणाल्या की मी याच ठिकाणची आहे सत्यव्रत काळे यांचा मला अभिमान वाटतो यापुढे असेच विधायक उपक्रम त्यांच्या हातून घडो अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली, तसेच यावेळी दिलीप शिंदे, शुभम अहिवळे, अशोक इंगुले, इरफान शेख, एस एन जगताप, यांनी आपले मनोगते व्यक्त केली
कार्यक्रमाचे प्रस्ताविक तैनूर शेख यांनी केले तर आभार निलेश धालपे यांनी मानले. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यव्रत अर्जुनराव काळे यांनी केले. यावेळी आई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते