बारामती जिल्हा होण्याबाबतचा प्रस्ताव नाही.
बारामती : अशा प्रकारच्या वावड्या कोण उठवत आहे माहित नाही, मात्र बारामती जिल्हा होण्या संदर्भात कोणताही प्रस्ताव शासनापुढे नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
बारामतीसह अनेक तालुके जिल्हा होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत, याबाबत मध्यम प्रतिनिधींनी विचारले असता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामतीमध्ये माध्यम प्रतिनिधींना बोलताना प्रतिक्रिया दिली.
पुढे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मी अनेक वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केले आहे, ना त्या प्रस्तावाची कुठे चर्चा आहे, ना जिल्हा अंमलबजावणीची चर्चा आहे, या सर्व बातम्या कपोल कल्पित असून तथ्यहीन आहेत असेही व्यक्त केले.
