बारामतीच्या कनिष्ठ अभियंताचे निलंबन

बारामती : बारामती पंचायत समिती मधील कनिष्ठ अभियंता अक्षय झारगड यांचे निलंबित करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
वाघळवाडी येथे नागरी सुविधा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम मंजूर करण्यात आले होते त्यासाठी जागा देखील निश्चित करण्यात आली होती. मात्र ते काम प्रत्यक्ष ज्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरीच्या ठिकाणी न करता दुसऱ्याच ठिकाणी केल्याने झारगड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे तक्रार केली होती तसेच पंचायत समिती बारामती यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला होता तसेच कार्यकारी अभियंता कडून देखील याबाबत चौकशी करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अक्षय झारखंड यांच्यावर निलंबची कारवाई केली.