बारामतीत युवकावर कोयत्याने वार
बारामती : बारामती मधली कोयता दहशत थांबायचे काय नाव घेत नाही, वारंवार बारामतीत पुन्हा-पुन्हा कोयता संस्कृती डोकं वर काढत आहे, 30 सप्टेंबर 2024 रोजी महाविद्यालयामध्ये कोयत्याने वार करून विद्यार्थ्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा 21 डिसेंबर 2024 रोजी बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या रस्त्यावर रात्री 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला होता त्या पाठोपाठ त्या घटनेला महिना उलटत नाही तोच पुन्हा बारामतीत आणाखी एका युवकावर कोयत्याने वार करीत जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर हाकीकात अशी की काल शुक्रवार दि 17 जानेवारी रोजी बारामती येथील वंजारवाडी मधील युवक स्कुटी मोटरसायकल वरून चैतन्य अकॅडमी कडे जात असताना आरोपीने त्याला अडवून तुला आता सोडत नाही, मारून टाकतो असे म्हणून कोयत्याने मानेवर, पाठीत मांडीवर आणि हातावर वार केले आहेत. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी नागेश गोफणे यांच्या विरोधात सिद्धार्थ चौधर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वरील तीनही घटना शिक्षण संस्था आणि अकॅडमी यांच्या आसपास घडल्या आहेत त्यामुळे पोलिस प्रशासनाने या घटनांमधून बोध घेऊन या शिक्षण संस्था आणि अकॅडमी यांच्या आसपास गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
