मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या इसमांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई १५,७०,०००/-रु. मेफेड्रॉन जप्त

बारामती : अंमली पदार्थ विरोधी पथकाची पुणे यांनी कारवाई करीत, मेफेड्रॉन ( एम.डी.) विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक केली असून या कारवाईत पोलिसांनी १५, लाख ७० हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले आहे.
सविस्तर हाकीकात अशी की अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे अधिकारी व अंलदार गुन्हे प्रतिबंधात्मक तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना बातमी मिळाली की लष्कर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एम. जी. रोड कोळया गल्लीत दोन इसम संशयीत रित्या उभे आहेत, त्या इसमांना पोलिसांनी ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यात ७७ ग्रॅम एम.डी हा अंमली पदार्थ अंदाजे किंमत साधारण १५ लाख ७०हजार रुपयांचा ऐवज आढळून आला, इसम नामे हुसेन नुर खान फैजान अयाज शेख ( वय २२ वर्षे ) दोघे रा. भागोदय नगर, कोंढवा पुणे ) अशी आहेत त्यांच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे १ गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदेश काकडे, विशाल दळवी, विनायक साळवे, प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख, योगेश मोहीते यांनी केली आहे.