बारामतीत धक्कादायक घटना ; बापानेच स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाचा केला खून

बारामती : अभ्यास करत नसल्याचा राग आल्याने वडिलांनी स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातील होळ येथे घडली आहे. आरोपी वडील विजय गणेश भंडलकर यांनी आपल्या मुलाला भिंतीवर आपटून, त्याचा गळा आवळून जीव घेतल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वडील विजय गणेश भंडलकर,आज्जी शालन गणेश भंडलकर, आणि चुलते संतोष भंडलकर (सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पियुष ( वय 9 वर्षे) घरात असताना, वडील विजय भंडलकर यांनी त्याला अभ्यासाविषयी खडे बोल सुनावले. “तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत आहेस, माझी इज्जत घालवतोस,” असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला.
संतोष भंडलकर यांनी मुलाला प्रथम जगताप हॉस्पिटल होळ येथे नंतर निरा येथील भट्टड डॉक्टरांकडे नेले. तेथेही मुलाचा मृत्यू चक्कर येऊन झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी पियुष मयत झाल्याचे सांगून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. मात्र, त्या तिघांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता पियुषचे प्रेत गावी नेले. मुलाच्या मृत्यूविषयी कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी करण्यात आली.मात्र पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी शिथापीने नातेवाईकांना विश्वासात घेऊन मुलाचे शवविच्छेदन केले त्यात मुलाचा खून केल्याचे उघड झाले या प्रकरणी विजय भंडलकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिकारी सचिन काळे, पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर राहुल साबळे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अनिल खेडकर, सागर देशमाने, महेश पन्हाळे, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसो मार्कड, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, तोफिक मनेर, नागनाथ पोरगे, विलास ओमासे, धनंजय भोसले, भानुदास सरक, विकास येटाळे, निलेश जाधव, महिला पोलीस अंमलदार प्राजक्ता जगताप, रजनी कांबळे, प्रियंका झणझणे यांनी केली अधिक तपास राहुल साबळे हे करीत आहेत