एन डी के कंपनीच्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, ठेका रद्द करून, मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

बारामती : घंटा गाडीचे प्रकरण चांगलेच तापले असुन, बारामतीच्या भाजी मंडईत गर्दीच्या ठिकाणी कचरा संकलन करणाऱ्या गाडीची ठोस लागुन महिलांचा अपघात करणाऱ्या चालकांसह एनडीके या कंपनीच्या मक्तेदारास सह आरोपी करून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर पोलिस प्रशासनाला तसेच मक्तेदाराचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी केली आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी एनडीके या बारामती नगरपालिकेच्या मक्तेदारास सहा आरोपी करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. तसेच निवेदन नागपालीकेच मुख्याधिकारी यांनादेखील देण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी संक्रातीच्या पूर्वसंध्येला संक्रांतीची खरेदी बारामती शहरातील गणेश भाजी मंडईमध्ये करीत असताना माझी उपनगराध्यक्षा ज्योती नवनाथ बल्लाळ यांच्यासह आणखी दोन महिलांना बारामती नगरपालिकेचा मक्तेदार एनडीके कंपनीच्या घंटा गाडी चालकाने मद्यधुंद अवस्थेत गाडी रिव्हर्स घेऊन ठोकले होते. त्यात तीनही महिला जखमी झाल्या होत्या त्यातील एक महिला या बारामती नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा आहेत त्यांनी संबंधित चालकाला जाब विचारला असता उडवाउडवीची आणि अरेरावीची भाषा संबंधित चालकाने केली होती, त्यावर चालक आणि त्याचे इतर दोन सहकारी यांचे वर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आता नगरपालिकेच्या झालेल्या करारानुसार मक्तेदाराची सर्व जबाबदारी असल्याने मक्तेदाराला देखील सह आरोपी करण्याची मागणी केली आहे.
तर मक्तेदार यांनी कराराचे उल्लंघन केल्यामुळे मक्तेदारीचा ठेका तात्काळ रद्द करून सदरच्या मक्तेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी तसेच जर काही अपघात झाला तर त्याची जबाबदारी चालकासह ठेकेदाराची असल्याने सदरच्या मक्तेदारावर गुन्हा दाखल होण्याकामी योग्य पत्रव्यवहार होणेकामी देखील निवेदन मुख्यधिकारी महेश रोकडे यांना देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागणार
या प्रकरणी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागणार असुन संबधित मक्तेदाराचा शहरात दिवसेंदिवस वरचष्मा वाढला असून वेळीच जरब द्यावा अशी मागणी करणार आहेत.
कार्यवाही करणार
या संदर्भाने बारामती नगरपालिकेचे मुख्यधिकारी महेश रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.