October 24, 2025

टकारी समाजाचा वधु वर मेळावा संपन्न

WhatsApp Image 2025-01-13 at 5.54.33 PM

बारामती : बारामती टकारी समाज विकास संस्था अंतर्गत बारामती टकारी समाजाच्या वतीने टकारी समाज वधु वर सूचक मेळावा व युवकांसाठी उधोजक मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी डॉ. सुधिर बाबुराव जाधव (लातुर) यांनी उपस्थित युवक, महिला व समाज बांधव यांना व्यवसाय कसे करावे त्या व्यावसायासाठीसाठी लागणारे कर्ज कसे मिळवावे यातून उधोग कसा करावा यासंदर्भाने मार्गदर्शन केले त्याच बरोबर समाजातील वधू-वर यांच्यासाठी राज्यस्तरीय मोफत वधू-वर आणि पालक परिचय मोफत मेळाव्यात जवळपास शेकडो वधू – वरांनी नाव नोंदणी केली,  यावेळी या कार्यक्रमास हजारो समाज बांधव भगिनी उपस्थित होते

बारामतीतील राधा कृष्ण मंगल कार्यालय बारामती याठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यासाठी राज्यभरातून वधू-वरांची नोंदणी केलीहोती, कार्यक्रमाचे आयोजन व संपर्क प्रमुख माजी उपनगराध्यक्ष अनिल गायकवाड, पत्रकार संतोष जाधव , शेखर गायकवाड, सरपंच सुभाष जाधव, बाळासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, ओंकार जाधव,  महेश गायकवाड, संदीप जाधव, संतोष गायकवाड, सयाजी गायकवाड, महेंद्र गायकवाड, अशोक जाधव, संजय गायकवाड, संजय जाधव, विलास गायकवाड, राहुल जाधव, किरण गायकवाड, लखन गायकवाड, चिंगप्पा जाधव, मयुर जाधव, अनिल जाधव सह अनेकांच्या वतीने उपस्थित समाज बांधवांचे जाहीर सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

You may have missed

error: Content is protected !!