मद्यधुंद घंटा गाडी चालकाने माजी उपनगराध्यकक्षांना ठोकले ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बारामती : नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षाना नगरपालिकेच्या मद्यधुंद घंटागाडी ( कचरा संकलन करणाऱ्या गाडीने ) चालकाने ठोकल्याची घटना बारामतीत घडली आहे या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी सुनीता लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी की, बारामतीच्या माजी उपनगराध्यक्षा ज्योती नवनाथ बल्लाळ या बारामतीच्या गणेश भाजी मार्केटमध्ये संक्रांतीची खरेदी करीत असताना नगरपालिकेच्या ठेक्यावर असलेल्या एनडीकेनामक कंपनीच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीच्या चालकाने मागे खरेदी करीत उभ्या असलेल्या माजी उपनगराध्यक्षा आणि त्यांच्या इतर दोन महिला सहकारी यांना कचरा संकलन करणाऱ्या गाडी रिव्हर्स घेऊन ठोस दिली, त्यामुळे तीनही महिला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत तर मद्यधुंद अवस्थेत गाडी का चालवतो असा जाब विचारला असता चालकाने उलट उत्तर देऊन चक्क माजी उपनगराध्यक्षांनाच अरेरावी केल्याचा प्रकार बारामतीत घडला आहे. या प्रकरणी आरोपी योगेश चव्हाण, शेखर पवार, विनायक शिंदे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती नगरपालिकेच्या सोबत एनडीके नामक कंपनीशी केलेल्या करार नुसार होणाऱ्या सर्व घटनानाची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची आहे, ठेकेदाराने कर्मचारी यांची जबाबदारी घ्यावी त्यामुळे संबंधित ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे
याप्रकरणी या एनडीकेच्या माध्यमातून अनेक गाड्यांच्यामध्ये बारामती शहरात कचरा संकल केले जाते त्यावर असणारे चालक अनेकदा मद्यपान करून आणि अल्पवयीन असतात ते गाडी चालविताना अनेकदा हालगर्जीपणा करतात हा प्रकार नित्याचा झाला असून चालक आणि त्याचे दोन्ही साथीदार हे मद्यपान करून गाडी चालवीत होते नगरपालिकेचे ठेकेदार आणि चालक यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे केसरीशी बोलताना माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी व्यक्त केले.
