October 24, 2025

अंजनगावत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सभागृहाचे उद्घाटन संपन्न

WhatsApp Image 2025-01-12 at 7.53.59 PM (1)

बारामती : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजी राजवटीविरुद्ध सशस्त्र लढा देत देशवासीयांना स्वातंत्र्याचे स्वप्न, बळ आणि विश्वास दिला. त्यांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली. राजे उमाजी नाईक यांचे शौर्य आणि पराक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. त्यांचे स्थान देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आणि देशवासीयांच्या हृदयात कायम राहणार आहे. अशा आपल्या देशाच्या थोर सुपुत्राचे आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण केले पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

तालुक्यातील अंजनगाव येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक सभागृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी पवार बोलत होते.

या सभागृहाचे मान्यते पासून ते सभागृहाचे काम पूर्ण होईपर्यंत तसेच उद्घाटन सोहळा होईपर्यंत गावातील दिलीप परकाळे, बाळासाहेब परकाळे, दादासाहेब मोरे, माजी सरपंच सविता परकाळे, सरपंच प्रतिभा परकाळे, माजी सरपंच  छाया मोरे, माजी सरपंच सोनाली परकाळे, माजी उपसरपंच मिलिंद मोरे, उपसरपंच नामदेव परकाळे, माजी उपसरपंच सुभाष वायसे, माजी सरपंच बाळासाहेब वायसे, मोहन चव्हाण, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने, जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्ष किरण खोमणे, तसेच गावचे पोलीस पाटील ईश्वर खोमणे, आदीनी सहकार्य केले. सभागृहासाठी उद्योजक स्वराज फर्निचरचे सर्वेसर्वा सुरेश परकाळे यांनी फर्निचर देऊन सभागृहाची शोभा वाढवली. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार प्रदर्शन सतपाल चव्हाण यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!