अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, 43 लाख 87 हजार रुपये किमतीचा चरस व गांजा जप्त

पुणे : अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करीत साधारण 43 लाख 87 हजार रुपये किमतीचा चरस व गांजा जप्त केला असून बेकायदा विक्री करणाराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, दिनांक 10 जानेवारी रोजी अमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व पोलीस कर्मचारी असे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमी मिळाली की एक इसम हा बेकायदा चरस आणि गांजा विक्री करीत आहे , मिळालेल्या बातमी नुसार पोलीसामी कारवाई करीत छापा टाकला असता सदर इसम नामे अरुण अशोक अरोरा ( वय 50 वर्ष रा. प्रीतम हाइट्स, कात्रज पुणे ) यांच्या ताब्यात एकूण 43 लक्ष 87 हजार रुपये किमतीचा दोन किलो 140 ग्रॅम वजनाचा चरस व एक किलो 790 ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ आढळून आले त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे हे करीत आहेत.
वरील कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक, यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, संदीप जाधव, दिशा खेवलकर, रवींद्र रोकडे यांनी केली.