उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने सफाई कामगारांचा 20 वर्ष प्रलंबित प्रश्न लागला मार्गी

बारामती : त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनेत्रा पवार यांनी स्वतः जातींने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवला आणि 1985 मधील सफाई कमगार याच्या वारसांना नोकरी वर घेण्याचा मार्ग मोकळा झाला, 13 कामगारांना मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले,उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने सफाई कामगारांचा 20 वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.
बारामती नगर परिषद मधील 1985 चे रोजंदारी वरील सफाई कामगार सेवानिवृत किंवा स्वेछा निवृत्तीनंतर त्यांच्या वारसयाना नोकरीवर घेणे 2006 पासून शासन निर्णयाने बंद केले होते तेव्हा पासून 1985 मधील रोजदारी वरील क़ायम केलेले सफाई कामगार यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.
अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महराष्ट्र उपाध्यक्ष अॅड धीरज लालबीगे यांनी सुधारित शासन निर्णय प्रमाणे 1985 मधील सफाई कामगार याना लाड़ समितीच्या शिफारशीप्रमाणे लाभ मिळावा व त्यांचे वारसाना नोकरी वर घेण्यात यावे म्हणून मागणी केली होती त्यावरून बारामती नगर परिषदने अभिप्रायासाठी प्रस्ताव शासना कड़े पाठवला होता.
बारामती नगर परिषदमध्ये 1985 मधील सफाई कामगार यांच्या पैकी 13 कामगारांना मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले व उर्वरित सफाई कामगार यांची कागद पत्र छाननी करून पात्र वारस याना नियुक्ति देण्यात येणार आहे याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, अॅड धीरज लालबिगे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, पिंकी मोरे व कामगार वर्ग उपस्थित होता.
या कामात अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महराष्ट्र उपाध्यक्ष अॅड धीरज लालबिगे, अक्षय माने, युवराज खिराड़े, पिकी मोरे, मोहन बिरलिंगे व इतर सर्व सफाई कामगार प्रतिनिधी यांनी पाठ पुरावा केला होता.