December 9, 2025

बदलत्या वातावरणानुसार शेतीमध्ये वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान कृषिक -२०२५  पाहूया

WhatsApp Image 2025-01-11 at 7.39.40 PM

बारामती : अचानक येणारा पाऊस, वाढते तापमान आणि अचानक पडणारी थंडी यापासून भाजीपाला पिकांचा बचाव करणे तसेच बिगर हंगामी भाजीपाला उत्पादन यशस्वीरित्या  पॉलीहाउस, शेडनेटहाउस व इनसेक्ट नेटहाउसमध्ये भाजीपाला उत्पादन घेण्यावर सध्या शेतकरी बांधव भर देत आहेत. यासाठी लागणारी संपूर्ण माहिती कृषिकमध्ये भाजीपाला गुणवत्ता केंद्र,के.व्ही. के बारामती मधून उपलब्ध करून दिली जात आहे. देशातील भाजीपाल्याचे उत्पादन मागणीनुसार वाढत आहे, वातावरणातील बदलानुसार बहुतांश शेतकरी संरक्षित शेती किंवा पॉलीहाउस, कमी खर्चातील शेडनेटहाऊस शेतीकडे वळत आहे. या मध्ये प्रामुख्याणे पॉलीहाउसमध्ये तसेच कमी खर्चातील शेडनेटहाऊसमध्ये रंगीत ठोबळी मिरची, काकडी, टोमॅटो, चेरी टोमॅटो व परदेशी भाजीपाला पिकांची लागवड करत आहेत. शेतकर्यांना कमी कालावधीत जास्ती जास्त नफा मिळवून देण्याच्या द्रुष्टीने भाजीपाला पिके उत्पादनाची प्रात्यक्षिके  घेण्यात आली  आहेत.

उद्यानविद्या घटकांतर्गत विविध  परदेशी फळपिके ( चेरी,अवोकॅडो, सफरचंद, लीची,निळी व लाल केळी,पिच, पिअर,काळï कांदा,तैवान पेरू,थायलंड फणस,डाळिंब विविध वाण आणी जर्मनीतील ७० प्रकारचे विविध फुलांचे वाण व इतर फळपिके आणि फुलपिके, शेवंती फुलपिकाच्या २९ हुन अधिक वाणाची प्रात्यक्षिके  व भाजीपाला पिके यांचे सुधारित वाण, टोमॅटो व भोपाळा याचे ३० हुन  अधिक वाण,  आधुनिक लागवड पद्धत, जैविक खत, कीड व्यवस्थापन, काढणीपश्चात व्यवस्थापन ते निर्यात व्यवस्थापन या सर्व आधुनिक पद्धतीचा वापर करून कमी खर्चामध्ये दुप्पट उत्पन्न कसे घेत येईल याची माहिती तसेच फळे व भाजीपाला प्रक्रिया व त्याची निर्यात विषयची माहिती या ठिकाणी मिळणार आहे.

हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान म्हणजेच जमीन न वापरता पाणी किवा ईतर माध्यमामध्ये   पिकांची लागवड करण्याची पद्धत. या पद्धतीमध्ये मातीच्या ऐवजी पाण्याचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये आवश्यक खनिज पदार्थ वगळून पिकांच्या मुळांना पोषण मिळवण्यासाठी पाणी व पोषणद्रव्यांचा वापर केला जातो. हायड्रोपोनिक्स पद्धतीत पिकांना मातीच्या साहाय्याशिवाय वाढवता येते. पारंपारिक शेतीच्या तुलनेत हायड्रोपोनिक्समध्ये ५० ते  ६० पाण्याची कमी गरज असते.  सेंद्रिय व  विषमूकत्त भाजीपाला उत्पादन या पद्धतीने घेता येते. या ठिकाणी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरुन  विविध  ७ प्रकारची प्रात्यक्षिके दाखविण्यात आलेली आहेत.अमेरिका,जपान, नेदरलँड, जर्मनी,ब्राजील,थायलंड व तुरकस्थान या देशातील विविध शेती उपयुक्त तंत्रज्ञान पाहावयास मिळणार आहे. तसेच अॅक्वापोनिक्स तंत्रज्ञानाचे प्रयोग बघावयास मिळेल.

         हे सर्व तंत्रज्ञान दाखविण्याचा उद्देश म्हणजे शेतकरी बांधवांना जगामध्ये काय चालेले आहे आणि हे तंत्रज्ञान अवगत करताना आपल्या भारतीय वातावरणानुसार बदल करून व शेतकऱ्यांना  परवडेल अशा पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी या कृषिक -२०२५  प्रात्यक्षिक आधारीत तंत्रज्ञान प्रदर्शनामध्ये दि. १६  ते २०  जानेवारी २०२५  या कालावधीमध्ये सहभागी होऊन आपल्याशी निगडीत आवश्यक तंत्रज्ञान स्वीकारावे असे आवाहन अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले आहे.

error: Content is protected !!