अफिम विक्री करणाराला पोलिसांनी केले जेरबंद, दोन लाख, बावीस हजार, सहाशे रुपये किमतीचा आफिम जप्त

पुणे : पुण्यात बेकायदेशिररित्या अफिम विक्री करणाऱ्या एका इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे पुणे शहर शाखेच्या पोलिस पथकाने जेरबंद केले असून त्याच्याजवळ साधारण १११ ग्रॅम वजनाचे दोन लाख, बावीस हजार, सहाशे रुपये किमतीचा आफिम हा अंमली पदार्थ आढळून आला आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे पुणे शहर शाखेची कारवाई १११ ग्रॅम अफिम विक्री करणाऱ्या एका इसमांस जेरबंद केले असून अंमली पदार्थ विरोधी पथका कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक, अनिकेत पोटे, व पोलिस कर्माचारी यांनी दि. ०७ जानेवारी रोजी पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान खराडी पुणे येथे रोडवर एक इसम विजयसिंग खिंमसिंग राजपुरोहित ( वय ३७ वर्षे, रा. क्रांतिपार्क लेन नं ०९, कोलंबीया एशीया हॉस्पीटल शेजारी, खराडी पुणे.) हा संशयीतरित्या मिळुन आल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन त्याची व त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये दोन लाख, बावीस हजार, सहाशे रुपये किमतीचा ऐवज मिळुन आला असुन त्यामध्ये १११ ग्रॅम वजनाचे आफिम हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला. म्हणुन त्याचे विरुध्द चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलिस आयुक्त, गुन्हे १. गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहरचे उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवी, दया तेलंगे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.