बारामतीत जागतिक दर्जाचे कृषी प्रदर्शन यंदा बारामतीत भरणार, देशातील पहिले फार्म ऑफ द फ्युचरची प्रदर्शनात उभारणी

बारामती : एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र मार्फत यंदा कृषी हे जागतिक स्तरावरील शेती विषयक प्रात्यक्षिके आधारित कृषी प्रदर्शन दिनांक 16 ते 20 जानेवारी या कालावधीत 170 एकर प्रक्षेत्रावर आयोजित केले आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यंदा शेतकऱ्यांना नेदरलँड, चीन, अमेरिका, इजराइल, ब्राझील, स्पेन, इटली, जर्मनी, आफ्रिका, फ्रान्स सह जगातील वीस हून अधिक देशातील विविध एआय सेंसर व रोबोटिक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधे, मशिनरी, पॉलिहाऊस लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टूल्स, पाहण्याची नामी संधी असणार आहे. प्रदर्शनात देशातील पहिले फार्म ऑफ द फ्युचरची उभारणी करण्यात आली आहे. तर वीसहून अधिक देशातील जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट आणो या जगातील सर्वोत्तम ऑक्सफर्ड विद्यापीठा लंडन यांच्यासह सहकार्यातून सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म वाइबच्या द्वारे ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय आयओटी वीआर यांच्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करून तंत्रज्ञान विकसित केले आहे.
सेन्सर ड्रोन, रोबोटिक सॅटॅलाइट, मॅपिंग रिमोट सेन्सिंग आधी क्लस्टर आधारित प्रात्यक्षिके, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान लाल भेंडी, त्यांचे आत्याधुनिक वाण, लाल मुळा एक किलो, वजनाचा कांदा, करटोली, लांब वांगे, तुर्कस्थानी बाजरी, जास्त उत्पन्न देणारे वाण निळे लाल केळी विविध फळे पिके रामभूतान पीयर, पीच, प्लम, सफरचंद, आबा, ब्लूबेरी रासबेरी फुल पिके, लाल फणस, चेरी, रोज मेरी, ऑरगॅनो, सेज अॅस्प्रॅगस आधी पीक प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत.
पीक संरक्षणाकरता नॅनो तंत्रज्ञान आधारित खते, कापड अच्छादन तंत्रज्ञान व कमी खर्चिक नेट हाऊस, स्टेजिंगचे नवीन तंत्रज्ञान आधारित काकडी, फुल पिके व भाजीपाला ऍग्रो अंतर्गत मिलीया डुबिया, नैसर्गिक शेती यामध्ये होमिओपॅथिक तंत्रज्ञानाचा वापर करून कीड रोग व खते व्यवस्थापन पशुपक्षी प्रदर्शन आणि डॉक्टर आप्पासाहेब पवार अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये मारवाडी, भीमथडी असे देखणे आणि दिमाखदार उत्तम प्रतीचे अश्व पाहायला मिळणार आहेत तसेच या दरम्यान पशुप्रदर्शनामध्ये संकरित जर्सी, संकरीत हॉलस्टीन गाईमध्ये दूध उत्पादन, तसेच उत्तम प्रतीच्या कालवडींचा हिरकणी शो आयोजित करण्यात येणार आहे. विविध जातीचे गाई उदाहरणार्थ 30 ते 40 लूट लिटर दूध उत्पादन देणाऱ्या संकरित होलस्टीन व संकरित जर्सी गाई कालवाडी टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञाने तयार झालेल्या कालवडी पाहण्यासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध असणार आहेत. हे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यासाठी एक पर्वणीच आहे.