बारामतीत सेवानिवृत्त फौजदारांचे भर दिवसा घर फोडलं

बारामती : बारामती शहरात एका सेवानिवृत्त सहाय्यक फौजदारांचे घर, भर दिवसा घरफोडीची घटना घडली असून यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख 23 हजारांचा मुद्देमाल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
बारामती शहरात राहणारे सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार बाळासाहेब पानसरे ( रा. शेफाली गार्डन सम्यक चौक बारामती ) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी साधारण सव्वा बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास भर दिवसा घडली आहे. पानसरे यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा तोडून, कुलूप तोडून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा साधारण तीन लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल भर दिवसा घरफोडी करून चोरून नेला आहे.