पत्रकार विरुद्ध पोलिस अटीतटीच्या क्रिकेट सामन्यात, पोलिस संघाचा विजय

विजयी संघ ट्रॉफी स्वीकारताना
बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यादगार बारामती कप 0.2 या टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले असून या स्पर्धे दरम्यान पत्रकार इलेव्हन विरुद्ध पोलीस इलेव्हन अशी मैत्रीपूर्ण लढत झाली. या सामन्यामध्ये पोलीस इलेवन संघाने विजय मिळवला.
सामन्यासाठी बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या नेतृत्वाखाली सतिश राऊत, अक्षय सिताप, सोमनाथ करचे, संतोष जगताप, वैभव मदने, अतुल कोळी, दीपक दराडे, संदीप झगडे, सनी गाढवे असा संपूर्ण संघ खेळत होता, तर पत्रकार इलेव्हन संघ, पत्रकार अभिजित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तैनूर शेख, तानाजी पाथरकर, स्वप्नील कांबळे, मन्सूर शेख, नवनाथ बोरकर, दीपक कापरे, प्रशांत तुपे, गणेश सवाणे, निलेश शिंदे, विनय दामोदरे असा संपूर्ण संघ खेळत होता.