तु मला आवडतेस म्हणत, ऊसात ओढण्याचा प्रयत्न, झाला गुन्हा दाखल

बारामती : बारामतीत एका महिलेचा विनय केल्याची घटना तालुक्यात झाली असून तु मला आवडतेस म्हणत महिलेला ऊसाच्या शेतात ओढण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की बारामती तालुक्यातील एका गावात उसाच्या शेतात गवत काढत असताना आरोपीने फिर्यादील महिलेला तु मी म्हणतो तसं माझं ऐक, मग लगेच तुला पैसे देतो, तू नाही ऐकलं तर तुला पैसे देणार नाही, तू मला आवडतेस, म्हणून तर मी तुझ्यासोबत पैशाचे व्यवहार केला आहे असे म्हणून फिर्यादीचा डावा हात धरून उसाकडे ओढून नेण्याचा प्रयत्न केला तसेच मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून फिर्यादी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.