बारामतीत संयुक्त जयंती उत्सव संपन्न

मे. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशाने नुसार बारामती शहरामध्ये संविधान दिन व स्वातंत्र्यसेनानी ह. टिपू सुलतान व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती अतिशय उत्साहपुर्ण वातारवणामध्ये साजरी करण्यात आली.
सदर जयंतीवेळीस संविधानाची प्रतिकृती तसेच ह. टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमांचे रथातून देशभक्तीपर गीत व महापुरुषांच्या गीतांवर वाजत-गाजत बारामती शहरातून मिरवणुक काढण्यात आली सदर वेळी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जयंती मध्ये सर्व जाती-धर्मातील नागरीक व तरूण वर्ग मोठ्या उत्साहाने सामील झाले होते. मिरवणूक गांधी चैक येथे येताच अॅड. धीरज लालबिगे भगवान विर गोगादेव निशाणा आखाडा अध्यक्ष व अध्यक्ष – मेहतर वाल्मिकी विकास परिषद तसेच अक्षय माने व कार्यकर्ते यांनी संविधान व महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून स्वागत केले. यानंतर भिगवन चौक याठिकाणी ब.स.पा. चे शहराध्यक्ष चंद्रकांत खरात व कार्यकर्ते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून स्वागत केले. तसेच इंदापूर चौक याठिकाणी सिध्दार्थ घाडगे, बंटी जगताप यांनीही मिरवणुकीचे स्वागत केले तर गुनवडी चौक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जितीन कवडे व सुमित सोनवणे तसेच कार्यकर्ते स्वागत केले.
सदर जयंती यशस्वी होण्यासाठी AIMIM जिल्हाध्यक्ष फैय्याज ईलाही शेख, ब.स.पा.चे प्रदेश सचिव काळूराम चैधरी ,माजी नगरसेवक गणेश सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, गौतम शिंदे, अशरद शेख, फरहान बागवान, अमीर शेख, अन्वर बागवान, हसन शेख, अॅड. बाबाजान शेख, अॅड. बिलाल बागवान, वैभव जगताप, चेतन साळुंके, जावेद बागवान व इतर कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.