बारामतीत बसपाच्या वतीने निषेध आंदोलन

बारामती : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरी उल्लेख केल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ निषेध मोर्चा व देशव्यापी धरने आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आले.
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री कु. मायावती यांच्या आदेशानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये भाषण करते वेळेस भारतीय संविधानाचे निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरी उल्लेख करीत वक्तव्य केले आहे. त्यांनी देशाची माफी मागावी म्हणून त्यांच्या निषेधार्थ बारामतीत बसपाचे काळूराम चौधरी यांच्यानेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.
सकाळी भीमनगर समाजमंदिर येथून निषेध मोर्चा शहराच्या दिशेने, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक मार्गे काढीत शहरातून बारामती नगरपरिषदेसमोर मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले धरणा आंदोलन होऊन उपस्थितांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बसपाचे महा. प्रदेश महासचिव काळूराम चौधरी, माजी विधान सभा अध्यक्ष अनिकेत मोहिते, तसेच अनेकांनी तीव्र शब्दात निषेध केला तर बसपाचे श्रीपती चव्हाण, सुनील चव्हाण, चंद्रकांत खरात, दयानंद पिसाळ, दादा टेकाळे,बाळासाहेब पवार, शाम तेलंगे, विशाल घोरपडे, रोहित लोंढे, प्रफुल्ल वाघमारे, लखन मिसाळ, रोहित जगताप, शैलेश सोनवणे, प्रदीप साबळे यांनी नियोजन केले.