पीकामधील लष्करी अळी नियंत्रण करण्यासाठी शेतकरी यांना मार्गदर्शन
बारामती : इंदापुर येथील शासकीय कृषी विभागाच्या वतीने मका पीकामध्ये लष्करी अळी नियंत्रणा विषयी शेतकरी यांना नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.
येथील मौजे कळंब व चिखली येथे तालुका कृषी अधिकारी इंदापूर भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली मका पीकामध्ये लष्करी अळी नियंत्रण विषयी शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी उपस्थित शेतकरी यांना मंडळ कृषी अधिकारी सणसर जयकुमार मेटे व कृषी सहाय्यक एस. जी. कांबळे, यांनी माहिती दिली, तर ही लष्करी अळी मका, ज्वारी, ऊस या पिंकावर आढळून येते या किडीचा पतंग एका रात्रीत सुमारे 100 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करु शकतो, त्याच बरोबर या किडीची प्रजनन क्षमता जास्त असुन मादी पतंग तिच्या जीवनक्रमात सुमारे 1 ते 2 हजार अंडी घालु शकते व या कीडीचा जिवनक्रम अंडी. अळी. कोष. व पतंग अशा चार अवस्थेत पूर्ण होतो त्यामुळे नियंत्रण करणे गरजेचे आहे त्यासाठी जैविक नियंत्रण प्रती एकरी 5 कामगंध सापळे उभारून नियंत्रण करावे तसेच रोपावस्था ते सुरवातीची शेंडावस्था पिक उगवती नंतर 5 ते 7 आठवडे 5% निंबोळी अर्क किंवा 1500 पीपीएम ॲझाडीरॅक्टीन 50 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी नंतर 5 ते 7 आठवड्यांनी अळी दिसु लागल्यास स्पिनेटोरम 11.7% एस. सी किंवा थायामेथाॅक्झाम 11.7%+ लॅमडा सायहॅलोथीन 9.5% झेड. सी या किटकनाशकाची फवारणी करावी असे आवाहन उपस्थित शेतकरी यांना दिले यावेळी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माराग्दर्शन केले.
