October 24, 2025

नाताळ सनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभेच्छा

WhatsApp Image 2024-12-24 at 6.25.21 PM

बारामती : नाताळ सनानिमित्त ख्रिस्ती समाजास बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या वेळी पुणे जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जयकुमार महादेवराव काळे, पास्टर अब्राहाम श्रीवास्तव, चर्च ऑफ क्राइस्टचे अध्यक्ष सुशील जाधव, चर्च ऑफ क्राइस्टचे सचिव, राजेश जाधव, पास्टर आशिष पंडेला, पास्टर राजेश गायकवाड, पास्टर सिंग व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहर महिला अध्यक्षा आरती शेंडगे, अल्पसंख्यांक विभाग बारामती शहर अध्यक्ष असलम शेख, सामाजिक न्याय विभाग बारामती शहर अध्यक्ष  मनोज केंगार, अल्पसंख्यांक विभाग बारामती शहर उपाध्यक्ष जावेद शेख,  उपाध्यक्ष विवेक साळवी, संघटक शशिकांत वागळे, सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष सागर जाधव, बारामती शहर उपाध्यक्ष शहाजी जाधव,  उपाध्यक्ष शशिकांत पाबळकर तसेच ख्रिस्ती समाजाचे सुदेश कांबळे, राजाभाऊ नॉर्टन, मनोज गायकवाड, शशिकांत अमोलिक, अभिजीत वागळे, कशिश दामले, विलास गायकवाड व मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाजातील बंधू-भगिनी व बारामती परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी  ख्रिस्ती समाजाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या,  तसेच ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय समाज असून पहिल्यापासून या समाजाचे वैद्यकीय क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान असल्याचे नमुद करून सर्व ख्रिस्ती समाजाचे कौतुक केले.

You may have missed

error: Content is protected !!