मोबाईलसह बँक खाते हॅक करून तीन लाखांचा गंडा
बारामती : मोबाईल हॅक करून बँकेच्या खात्यातील तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना बारामतीत घडली आहे या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की फिर्यादीचे खाते बारामती येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जळोची येथील बँकेत शाखेत आहे त्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी चक्क मोबाईल हॅक करून तसेच खातेदाराच्या आराधार कार्ड देखील छेडछाड केल्याचा प्रकार घडला आहे खातेदाराला माहिती होऊ नये आणि त्याच्या खात्यावरील रक्कम काढता यावी यासाठी सायबर चोरट्यांनी चक्क मोबाईलच हॅक करून बंद केल्याचा प्रकार घडला आहे फिर्यादीच्या परवानगी शिवार परस्पर त्याच्या खात्यातून तीन लाख बारा हजार तीनशे बँक ऑफ महाराष्ट्राच्या इतर शाखेत तसेच इतरत्र वर्ग बर्ग केली आहे. या प्रकरणी नंदकिशोर गोविंद खास, जस नितीन छडा आणि इतर साथीदार यांच्याविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
