October 24, 2025

मास्टर मांइट कोणीही असला तरी, तो सुटणार नाही…अजित पवार

WhatsApp Image 2024-12-22 at 8.24.45 PM

छायाचित्र : स्वप्नील शिंदे, बारामती.

बारामती : बीडमध्ये सरपंच अनिल देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे, त्या घटनेचा मास्टरमाइंड कुणी असला तरी त्याला सोडणार नाही. बीडच्या घटनेत आम्ही तिघांनी लक्ष घातलं आहे, असा थेट इशार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा  जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पवार बोलत होते.

पुढे पवार म्हणाले की, बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात सिव्हिल सर्जनशी बोललो. ते म्हणाले पोस्टमार्टेम करताना इतकी वाईट केस कधीच बघितली नाही..एखाद्या प्राण्याला मारताना देखील आपण विचार करतो. परंतु अमानुषपणे तिथे गोष्टी घडलेल्या आहेत. या शिव-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. अशा घटनांमुळे शरमेनं मान खाली जाते”, बीडची घटनेच्या प्रकारणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल, प्रकरण फास्ट ट्रॅक चालवुन मग तो कोणी का असेना या नालायक आरोपींना फाशीची शिक्षा झाल्या शिवाय सोडायचे नाही, पुन्हा असे घडता कामा नये, तर परभणीमध्ये घडलेल्या घटनेत देखील आम्ही लक्ष घातलं आहे. पोलीस यंत्रणेला आदेश दिले आहेत, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले,

विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं

विरोधकांकडून विधानसभा निकालानंतर सातत्यानं ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे, जनता एवढा एकतर्फी निकाल देईल असे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही कधीही इव्हीएमला दोष दिला नाही. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती अधिक जोमाने कामाला लागली, लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणि शेतकरी वर्गासाठी केलेल्या वीज माफीमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्याचे पवारांनी व्यक्त केले.

तर विधानसभा निवडणुकीच्या दिवशी काही चॅनेलने पोस्टल मतमोजणीत मला मागे दाखवले. मग त्यावेळे माझी आई थेट देवघरात गेली. ती त्या ठिकाणी पांडुरंगाचा जप करत बसली. माझी बहीण विजया अक्का आईला सांगत होती आम्ही बारामतीत फिरलो आहे नक्की दादा निवडून येईल. मात्र आई देवासमोरच बसली होती, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.

लोकसभेच्या निवडणुकीत ३८२ बुथवर आपण मागे होतो.

विधानसभा निवडणुकीत ३८२ बुथवर आपण पुढे आलो. बारामतीकरांनी भरघोस मतांनी निवडून दिले आहे. तुमच्यापुढे नतमस्तक होतो, असे भावनिक वक्तव्य करीत

लाखांच्या फरकाने जेव्हा तुम्ही निवडून देता तेव्हा मोठा अभिमान होतो त्यामुळे या टर्ममध्ये सर्वात जास्त काम करणार तर सध्या साखरेचे भाव पडले आहेत मात्र इतर ठिकाणी फिरत असताना आपल्या बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याची उच्चांकी भाव दिल्याने राज्यभर चर्चा असते मात्र तिथेच साखर सम्राट मात्र खाली मान घालून बसतात असा टोला साखर सम्राटांना लगावत  भाषणाच्या शेवटी अजित पवारांनी थांबलो नाही, थांबणार नाही या आशयाची चारोळी वाचून दाखविली

बूथ कमिटीशी चर्चा करून विकास कामे करणार

प्रत्यक निवडणुकीत बूथ कमिटी काम करते यापुढे त्यांच्याशी चर्चा करूनच गावातली विकास कामे करणार असे व्यक्त करीत असताना उपस्थितांनी एकच घोषणा नाद केला तर निवडणुकीत जे काम करतात ते बाजूला राहतात आणि ननको ते पुढे-पुढे करतात असा टोला पवारांनी गाव पुढाऱ्यांना लगावला.

You may have missed

error: Content is protected !!