October 24, 2025

चिखली येथे शेतकरी यांना पाचट व्यवस्थापन मार्गदर्शन

WhatsApp Image 2024-12-21 at 5.46.15 PM

बारामती : इंदापुर तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील चिखली येथे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात ऊस पाचट व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी खोडवा उसाचे पाचट जाळु नका, पाचट एका आड एक सरीत ठेवा, पाचट कुजवा, त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तर पाचट व्यवस्थापन केल्यामुळे एकरी 40 ते 50 लाख लिटर पाणी बचत होऊ शकते, जागेवरच एकरी 2.5 टन सेंद्रिय खत मिळते, ऊस उत्पादन 4 ते 5 टनांपर्यंत वाढ होऊ शकते, खुरपणी व अंतर मशागतीच्या खर्चात साधारण ३५% बचत होऊ शकते, पाचट व्यवस्थापनामुळे एकरी ५५ किलो अन्नद्रव्य उपलब्ध होते आणि त्याचा फायदा उत्पादनातून थेट मिळतो अशी माहिती सणसर मंडळ कृषी अधिकारी जयकुमार मेटे यांनी दिली तसेच कृषी सहायक शाम कांबळे यांनी पाचट कुजवण्यासाठी  एकरी ५० कीलो युरीया, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, आणि जिवाणू कल्चर १ लीटर यांचे मिश्रण समप्रमाणात पाचटावर टाकावे अशी माहिती दिली यावळे शेतकरी नवनाथ अर्जुन, तुकाराम वणवे, पांडुरंग अर्जुन, दगडु कदम तसेच इतर शेतकरी उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!