आरोपींच्या बारा तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बारामती : परवा रात्री बारामतीत झालेल्या खुनातील आरोपींच्या पोलिसांनी बारा तासात मुसक्या आवळल्या असून ही घटना घडण्यापूर्वी मयत आणि आरोपी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती, मयत मला संपविणार या दृष्टीकोनातून त्या आधीच आरोपींनी कट रचुन हा खून केल्याचे पोलिसांना निष्पन्न झाल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकारांना दिली.
बारामतीत अनिकेत सदाशिव गजाकस ( वय २३ वर्षे ) याचा बारामती मधील प्रगतीनगर क्रियेटिव्ह अॅकॅडमी कडुन टिसी कॉलेजकडे जाणारे रोडवरुन जात असताना आरोपी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे ( वय १९ वर्षे रा शेळकेवस्ती तांदुळवाडी बारामती ), महेश नंदकुमार खंडाळे ( वय २१ वर्षे रा तांदुळवाडी ता बारामती ) आणि संग्राम दत्तात्रय खंडाळे ( वय २१ वर्षे रा. शेळकेवस्ती तांदुळवाडी ता बारामती ) यांनी कोयत्याने वार करुन जीवे ठार मारुन त्याचा खुन केला होता त्यांना पोलिसांनी १२ तासात अटक केली आहे.
बारामती शहर पोलीसांनी तात्काळ गुन्हयाचा तपास करून गुन्हेगारांचा शोध सुरु केला, गुन्हयातील आरोपी हे गुन्हा करुन फरार झाले होते आरोपींचे मोबाईल नंबर नुसार माहिती काढुन सदर आरोपी सोलापुर जिल्हयातील अकलुज खंडाळी येथुन शिफातीने पकडुन आरोपींना अटक केली. त्यादरम्यान आरोपींकडुन गुन्हयात वापरेली मोटार सायकल जप्त करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर, यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक विलास नाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदिप संकपाळ, गुन्हे शाखेची टिम बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सतीश राऊत, व त्यांची टिम यांनी गुन्हयात उत्कृष्ट कामगिरी केली. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके हे करीत आहेत.
