बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सोमनाथ भिले कार्याध्यक्षपदी युवराज खोमणे यांची बिनविरोध निवड.
बारामती : गेल्या वीस वर्षापासून नोंदणीकृत असलेल्या व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक बैठक गणेश रेसिडेन्सी आठफाटा येथे नुकतीच पार पडली. त्यामध्ये अध्यक्षपदी एकमताने सोमनाथ भिले व कार्याध्यक्षपदी युवराज खोमणे यांची निवड करणेत आली. सचिव पदी चिंतामणी क्षीरसागर यांची निवड करण्यात आली.
पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य जयराम सुपेकर यांच्या अध्यक्षतेखाली हि बैठक संपन्न झाली.माजी अध्यक्ष मनोहर तावरे व सचिव क्षीरसागर यानी पत्रकार संघाद्वारे राबवलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, अशोक वेदपाठक, कल्याण पाचांगणे, वसंत मोरे ,संतोष शेंडकर,महेश जगताप मनोहर तावरे, हेमंत गडकरी,विजय मोरे,विजय गोलांडे,सोमनाथ लोणकर, दीपक जाधव, सुशील अडागळे,सचिन पवार, विनोद पवार, सुनील जाधव ई पत्रकार यावेळी हजर होते .माजी अध्यक्ष गणेश आळंदीकर यांनी निवडी जाहीर केल्या.
अध्यक्षपदी सोमनाथ भिले,कार्याध्यक्ष पदी युवराज खोमणे,सचिव.. चिंतामणी क्षीरसागर,उपाध्यक्ष पदी राजेश वाघ ,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्षपदी महेश जगताप,खजिनदार सुनील जाधव,सल्लागारपदी जयराम सुपेकर, ॲड गणेश आळंदीकर,दत्ता माळशिकारे यांची निवड करणेत आली. यावेळी पत्रकार शंतनु साळवे यांच्या गंभीर आजारावर उपचारासाठी कार्यक्रमाद्वारे एक लाख मदत करण्याचे ठरले.
