February 11, 2026

बारामतीत धारदार शास्त्राने वार करून खून

murder-hatya_20190412132817

बारामती : बारामतीतील प्रगतीनगर येथे क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सविस्तर हकीकत अशी की रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस ( वय 23 वर्षे ) या युवकाचा धारदार शास्त्रांनी वार करण्यात आले, यात गंभीर जखमी झाल्याने अनिकेत गजाकस याचा मृत्यू झाला फिर्यादीतील माहितीनुसार मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून अनिकेतवर वार करण्यात आले आहेत याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे, नंदकिशोर पंजाबराव अंभोरे ( रा. प्रगतीनगर ता. बारामती ) महेश नंदकुमार खंडाळे, ( रा. जिजामातानगर तांदुळवाडी बारामती ), संग्राम खंडाळे ( पूर्ण नाव पत्ता नाही ) या तिघा विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटना घडतात पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचली असुन तीनही आरोपी फरार आहेत.

error: Content is protected !!