महिला जिम ट्रेनरवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी
बारामती : बारारामतीत एका महिला जिम ट्रेनरवर प्राणघातक घतक हल्ला करून तसेच जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनय भंग केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हाकीकात अशी की माळेगाव येथील एका खाजगी जिम मध्ये फिर्यादी महिला जिम ट्रेनर म्हणुन काम करते दि 12 डिसेंबर रोजी सकाळी आरोपी याने लेग प्रेस मशीनवर व्यायाम करुन झालेनंतर त्याने त्या मशीनवर 25 किलो वजनाचे वेटचे 2 ते 3 प्लेट लावलेल्या होत्या, म्हणुन आरोपीला लावलेल्या प्लेट काढुन ठेवा असे म्हणालेवर मी प्लेट नाही काढणार, तुझे बापाची जिम आहे का ? असे म्हणुन चापट मारली व त्याचे हाताचे दंडाने फिर्यादी महिलेचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तुझ्या सह तुझ्या खानदानाला पिस्तुलाने मारून टाकेन अशी धमकी दिल्याची फिर्याद माळेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
