उपमुख्यमंत्री अजित पवारांचा त्यांच्याच घरासमोर निषेध

बारामती : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातुन डावलल्याने भुजबळ यांचे समर्थक संताप व्यक्त करीत आहेत. भुजबळ यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन करून निषेध केला.
जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातुन डावलल्याने राज्यभरातील ओबीसी समाज संतप्त झाला आहे. तर आमच्या नेत्याचे खच्चीकरण केले जात आहे, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे नाव यादीत होते आणि अचानक त्यांचे नाव वगळता, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाणीव ठेवुन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात घेण्याची जबाबदारी होती, ज्या नेत्यांच्या बळावर राष्ट्रवादी निवडून आली सत्तेत बसली त्याच नेत्यांना डावलले अशी भावना भुजबळ यांच्या समर्थकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली तर यावेळी आंदोलकांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचा निषेध करतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीतील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीच्या रस्त्यावरच ओबीसी आंदोलकांनी ठाण मांडले, आणि निषेध व्यक्त केला.