बारामतीत कडकडीत बंद, राज्य सरकार आणि प्रशासनाचा तीव्र निषेध

बारामती : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक शिल्प कृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोह्यावर कायदेशीर कार्यवाही करणे व पोलीस प्रशासनाच्या कोंबींग ऑपरेशन च्या नावाखाली परभणीमध्ये जीव घेणा प्रकार घडला तसेच न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक मृत्युमुखी पडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांकडून महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती, त्याच पार्श्वभूमीवर बारामतीत कडकडीत बंद पाळून मोर्चा काढण्यात आला.
बंदच्या पार्श्वभूमीवर बारामतीत निषेध मोर्चा काढून येथील तीन हत्ती चौक येथे राज्य सरकार आणि तेथील पोलिस प्रशासन यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चा शहरातील सिद्धार्थनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इंदापूर चौक, गुनवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक, भिगवन चौक मार्गे नगरपालिके समोर, निषेध मूक मोर्चा स्थिरावला यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच राज्यसरकार आणि पोलिस प्रशासन यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संखेने सर्व धर्मीय संविधान प्रेमी मोर्चात आणि निषेध सभेला उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे व पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदानाद्वारे परभणीत झालेल्या पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशनची सिटींग न्यायाधीशामार्फत न्यायालयीन चौकशी करावी, पोलिस निरीक्षक आणि इतर पोलिस कर्मचारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा तसेच सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारने 50 लाखांची तसेच इतर अटक असलेल्या आणि उपचार घेत असलेल्या भीम सैनिकांना आर्थिक मदत करावी, तसेच सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देवुन कुटुंबाचे पुनर्वसन करावे, संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी बसपाचे काळूराम चौधरी, भाजपाचे सचिन साबळे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, वंचितचे मंगलदास निकाळजे, माजी नगरसेविका आरती शेंडगे, माजी. नगरसेवक गणेश सोनवणे, बंटी सरोदे, सामाजीक कार्यकर्ते, दिनेश जगताप, विष्णुपंत चव्हाण, संतोष काकडे, शुभम अहिवळे, फैयाज शेख, सोमनाथ रणदिवे, गौतम शिंदे, मुनीर तांबोळी, दयानंद पिसाळ, रोहन मागाडे, विनय दामोदरे, अॅड. अक्षय गायकवाड, भास्कर दामोदरे, बंटी जगताप आरपीआयचे रविंद्र सोनवणे, सुनिल शिंदे, मयुर मोरे, मोहन शिंदे, बापु शेंडगे, चंद्रकांत खरात, साधु बल्लाळ, इम्रान पठाण, सुरज शिंदे, वंदना भोसले, रत्नप्रभा साबळे, यांच्यासह मोठ्या संखेने सर्वच समाजतील समाज बांधव उपस्थित होते.
आर्थिक मदतीचे आवाहन
यावेळी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत बारामतीतून देण्यात येणार असून ज्यांना कोणाला आर्थिक मदत द्यायची आहे त्यांनी सचिन साबळे, अनिकेत माहिते, काळूराम चौधरी, तसेच नवनाथ बल्लाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.