उद्या बारामती बंद

बारामती : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक शिल्पा कृतीची विटंबना करणाऱ्या देशद्रोह्यावर कायदेशीर कार्यवाही करणे व पोलीस प्रशासनाचा कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली जो परभणीमध्ये जीव घेणारा प्रकार घडला त्यातील न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक मृत्युमुखी पडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी आंबेडकरी संघटनांकडून महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या बारामती बंद चे आवाहन करण्यात आले आहे. उद्या बारामतीत 12 वाजेपर्यंत बंद पुकारण्यात आला आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर निषेध मुक मोर्चास व रिक्षा अलौसिंगसाठी परवानगी मिळणे बाबत बारामती शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सिद्धार्थनगर येथून सकाळी १०.०० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक इंदापूर चौक- गुनवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक, भिगवण चौक नगरपालिके समोर, या मार्गे निषेध मुक मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले असून बारामती नगरपरिषदेसमोर निधन झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून मुक मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने बारामतीमधील सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.