व्हाट्सअप वरून दिला तिहेरी तलाक : गुन्हा दाखल
बारामती : व्हाट्सअप या समाज माध्यमातून एकतर्फा तीन वेळा तलाक दिल्या प्रकरणी आणि छळ केल्याप्रकरणी आठ जणांना विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हकीकत अशी की तुझ्या वडिलांनी लग्नात मानपान केला नाही तसेच लग्नात लहान वस्तू दिल्या त्या ऐवजी आम्हालाच तीन-चार लाख रुपये हुंडा दिला असता तर आम्ही मोठ्या वस्तू लग्नात घेतल्या असत्या तसेच पतीला अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी तुझ्या घरच्यांना करायला सांग या कारणावरून स्वतःच्याच पत्नीचा मारहाण करून छळ केला या कारणावरून व्हाट्सअप या समाज माध्यमात एकतर्फा तीन वेळा तलाक दिल्या बाबत नोटीस पाठवुन पत्नीला तलाक देण्याऱ्या पती आणि त्याच्या इतर घरातील सात जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
