पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक

बारामती : बारामतीत पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी तरुणांनी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक करून लुटल्याची घटना बारामती शहरात घडली आहे.
सविस्तर हकीकत अशी की दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास जुना मोरगाव रोड बारामती येथे हॉटेल ओमच्या समोर सेवा निवृत्त कर्माचारी फिर्यादी रिटायर्ड कर्मचारी उभे असताना बुलेट हंटर मोटरसायकल वरून दोन अनोळखी इसम येऊन आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करून जवळच चोरी झाली असून तुमच्याकडील किमती वस्तू रुमालात बांधून ठेवा असे सांगून दोन तोळे व एक ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन आणि बदाम रुमालात न बांधता हातचलाखी करून स्वतःजवळ ठेवून फिर्यादीची फसवणूक करून साधारण एक लाख 26 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे, याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.