October 24, 2025
WhatsApp Image 2024-12-13 at 4.53.13 PM

बारामती : परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ बारामतीत निषेध मोर्चा काढून रस्ता रोको तसेच ठिय्या आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

बारामतीतील बहुजन समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, निषेध मोर्चाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून सुरुवात करण्यात आली तो इंदापूर चौक मार्गे भिगवन चौक, तीन हत्ती चौकापर्यंत काढण्यात आला यावेळी आंदोलकांच्या वतीने भिगवण चौकात ठिय्या आंदोलन करून आंदोलकांच्या वतीने स्थानिक प्रशासन आणि परभणीच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला

चोरी करणारा चोर होतो, बलात्कार करणारा बलात्कारी होतो, मग संविधानाचा अवमान करणारा मनोरुग्ण कसा ? असा संतप्त सवाल उपस्थित करीत परभणी येथील घटनेच्या संविधानाचे विटंबन करणाऱ्या आरोपीला देशद्रोही घोषित करून त्याला अजन्म कारावासाची शिक्षा द्यावी अशी मागणी बारामतीतील आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते यांनी आंदोलनाच्या दरम्यान निषेध व्यक्त करताना मागणी केली, तर परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ देशातील जे समाज बांधव आहेत त्यांनी संविधानिक पद्धतीने आंदोलन करावीत असे आवाहन बसपाचे काळुराम चौधरी यांनी बोलताना व्यक्त केले तसेच परभणी येथील आंदोलकांवर पोलीस प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे शासनाने मागे घ्यावेत असे देखील आवाहन करण्यात आले.

यावेळी सामाजीक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, वंचितचे मंगलदास निकाळजे, बसपाचे काळूराम चौधरी, सचिन साबळे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, फैयाज शेख, रोहन मागाडे, विनय दामोदरे, भास्कर दामोदरे, माजी.नगरसेवक अभिजित चव्हाण, बंटी सरोदे, सामाजीक कार्यकर्ते, दिनेश जगताप, विष्णुपंत चव्हाण, संतोष काकडे, धीरज लालबिगे, बंटी जगताप आरपीआयचे रविंद्र सोनवणे, मोहन शिंदे, सुरज शिंदे, यांच्यासह मोठ्या संखेने सर्वच समाजतील समाज बांधव उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्यावतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

आंदोलक स्थानिक प्रशासनावर संतापले 

प्रशासनाला आंदोलनाचे निवेदन देऊन देखील प्रशासनाने ज्या ठिकाणी निषेध सभा आयोजित करायची होती, त्या ठिकाणी बसायला जागाच नव्हती त्यामुळे आंदोलकांची गैरसोय झाली, तर प्रशासनाने जाणीवपूर्वक आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोर्चा ज्यावेळी नगरपालिकेच्या समोर आल्यानंतर आंदोलन आक्रमक झाले आणि त्यांनी चक्क शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मुख्य भिगवण चौकातच ठिय्या मांडला आणि बारामतीच्या नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी हलगर्जीपणा केला त्यामुळे त्यांचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.

You may have missed

error: Content is protected !!