प्रसिद्ध गायकावर बारामतीत गुन्हा दाखल
बारामती : प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांच्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याच पत्नीने त्यांच्याविरुद्ध फिर्याद पोलिसात दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी की, प्रसिद्ध गायक आणि आमदार झाल्यासारखं वाटतय गाण्याचे गायक संकल्प गोळे यांचा मागील वर्षी 5 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न केले होते मात्र लग्नानंतर एक महिन्यांनंतरच पत्नीला तिचे स्वतःचे उपजीविकेचे मुख्य साधन औषधाचे दुकान बंद करण्यास आणि घटस्फोट देण्यास दबाव आणला तसेच पत्नीचा विविध कारणांनी दारू पिवून छळ केला आणि माहेरून सोन्याचे दागिने आणण्यासाठी देखील दबाव आणला या कारणावरून त्यांच्या पत्नीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गायक गोळे यांच्या सह त्यांच्या घरातील इतर चार सदस्यांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायक गोळे यांची अनेक फेमस गाणी गायली आहेत, संगीत क्षेत्रात चंगली ओळख निर्माण केली आहे त्यांनी आमदार झाल्यासारखं वाटतय यासारखी लोकगीते गायली आहेत त्यामुळे त्यांनी अनेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे.
