तिप्पट पैशांच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

बारामती : तिप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून बारामतीत आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली असुन, याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बारामतीतील एका ॲम्बुलन्स चालकाला एक रुपयाला तीन रुपये देतो असे आमिष दाखवुन, त्याच्याशी जवळीकता साधुन, आठ लाख रुपये रोख रक्कम आणि दोन लाख रुपयेचा चेक असा साधारण दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असुन, याप्रकरणी विशाल विजय रुपनवर (रा. जांब ता. इंदापूर व एक अनोळखी इसम असे दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.