शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 17 लाख 70 हजाराची फसवणूक

पुणे : ऑनलाइन माध्यमातून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सैनिकवाडी, वडगावशेरी पुणे येथील 46 वर्षीय महिलेची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 17 लाख 70 हजाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी संबंधित महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे , सदर महिलेने एका अनोळखी मोबाईल धारका विरोधात फिर्याद दिली आहे, एका मोबाईल धारकाने ऑनलाइन माध्यमातून शेअर ट्रेडिंग मार्फत नफा मिळवून देतो असे म्हणून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडून आणि विश्वास संपादन करून फिर्यादीची 17 लाख 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.