अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांची कोयता उगारून हाणामारी

बारामती : बारामतीत अॅकॅडमी मध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली त्याचे रूपांतर चक्क हत्यारबंद भांडणात झाल्याचे समोर आले असुन भर दिवसा या विद्यार्थ्यांनी जमाव जमवून कोयता हातात घेतल्याची फिर्याद दाखल झाली असुन या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर हकीकत अशी की बारामती तालुक्यातील मौजे माळेगाव ता. बारामती येथील श्रीकांत अॅकॅडमी मध्ये बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची वर्गात शिकत असताना एकमेकाला धक्का लागला त्या धक्काबुक्कीचे रूपांतर भांडणात झाले अॅकॅडमी चालकांनी या संदर्भाने पालकांना बोलावून मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र आपापसात मिटल्यानंतर पुन्हा अॅकॅडमीच्या बाहेर दोन गटात विद्यार्थ्यांनी चक्क एकमेकांच्या हत्यार बंद गटांना बोलवून पुन्हा एकमेकांवर दहशत वाजवण्याच्या उद्देशाने कोयता, दगड, प्लास्टिकचे पाईप असे हत्यारबंद गटात रूपांतर केले आणि एकमेकांवर दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात नऊ जणांच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे तर याप्रकरणी अकॅडमीचे चालक श्रीकांत कारंडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.