बारामतीत भर दिवसा घरफोडी
बारामती : बारामती येथील तानाई नगर निर्माण रेसिडेन्सी जळोची बारामती येथे भर दिवसा दुपारच्या वेळी घरफोडी झाल्याची घटना घडल्याची उघडकीस आली आहे. या घटनेत घरफोडी करणाऱ्यांनी तब्बल एक लाख 81 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लांपास केले आहेत.
बारामतीतील तानाईनगर रेसिडेन्सी जळोची बारामती येथे सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी दुपारी घरफोडी झाल्याचे घरमालकाच्या निदर्शनास आले, घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तसेच कापाचे कुलुप अज्ञात चोरट्यांनी तोडून कपाटातील सोन्या चांदीचा साधारण एक लाख 81 हजार रुपये किमतीचा ऐवज लांपास केला आहे, याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
