चंपाषष्ठी’ महोत्सव निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

बारामती : खंडोबानगर येथील श्री खंडोबा देवस्थान समितीच्या वतीने चंपाषष्ठी’ महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राचं लोकदैवत असलेल्या श्री खंडोबाला सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूंपर्यंत मानलं जातं, त्याला पूजलं जातं. अश्विन महिन्यात जसा देवीचा नवरात्र उत्सव असतो तसा हा खंडेरायाचा सहा रात्रींचा उत्सव असतो. येथील श्री खंडोबा देवस्थान समिती खंडोबानगर चौक बारामती येथे दरवर्षी चंपाषष्ठी’ महोत्सवाचे योजन केले जाते. बारामती आणि परिसरात रक्ताचा असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात 81 रक्त बाटली रक्त संकलन झाले.
श्री खंडोबा देवस्थान समिती खंडोबानगर चौक, बारामती यांचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.तर आज दि 6 डिसेंबर रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन आणि उद्या शनिवार दि. 7 डिसेंबर रोजी समितीच्या वतीने खंडोबा मंदिर परिसरात, खंडोबानगर चौक येथे सालाबाद प्रमाणे सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.