October 24, 2025

बारामतीत महामानवाला वंदन

WhatsApp Image 2024-12-06 at 2.49.16 PM

बारामती :  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68  व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक बारामती येथे जयंती उत्सव समितीच्या वतीने सामुदायिक पूजा पाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यादरम्यान डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  पुष्पचक्र अर्पण करून पूजापाठाच्या कार्यक्रमास  सुरुवात करण्यात आली बारामतीतील शासकीय अधिकारी, कर्मचारी व समाजबांधव यांच्या वतीने महामानवास आदरांजली अर्पित केली.

यावेळी पूजापाठाच्या कार्यक्रमाला, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक विलास नाळे,  तहसीलदार गणेश शिंदे,  मूलनिवासी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सचिन साबळे, बसपाचे काळूराम चौधरी, माजी नगरसेविका अनिता जगताप, माजी नगरसेविका आरती शेंडगे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, माजी नगरसेवक सत्यव्रत काळे, सामाजिक कार्यकर्ते  बबलू जगताप, वि. श्री. कांबळे , प्रा रमेश मोरे , आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजीज शेख,  प्रा. अजित मुरुमकर, वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास निकाळजे, विनय दामोदरे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, भास्कर दामोदरे, पिंटू गायकवाड, चंद्रकांत खरात,अॅड अक्षय गायकवाड, सिद्धांत सावंत व समाज बांधव मोठ्या प्रमाणात अभिवादनाच्या कार्यक्रमास  उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बंटी जगताप, कार्याध्यक्ष मनोज दामोदरे, उपाध्यक्ष सोहेल शेलार तसेच समिती पदाधिकारी आणि समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी संविधान युवा प्रतिष्ठानच्या वतीने गरीब, गरजू विध्यार्थ्यांसाठी एक वही एक पेन दान संकल्पनेचे आयोजन करण्यात आले होते त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 

You may have missed

error: Content is protected !!