October 24, 2025

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणुन साईबाबांना प्रार्थना

IMG-20241128-WA0060
बारामती : अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी यासाठी  साईबाबाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी पालखी सोहळा बारामती हुन शिर्डी कडे प्रस्थान केला आहे.  बारामती ते शिर्डी असा  पायी पालखी सोहळा  साईच्छा सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व  मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे याच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत या विचाराने  पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी माजी नगराध्यक्षा भारती मूथा, मुख्यधिकारी महेश रोकडे, माजी नगरसेवक किरण गुजर, अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, सुधीर पानसरे व अविनाश बांदल, डॉ सौरभ मूथा,  दिनेश जगताप, शिर्डीचे मदन मोकाटे, जालिंदर सोनवणे, रमेश सोनवणे,  तुषार थेटे,  मंगेश चौधरी, मातंग एकता आंदोलनचे राजेंद्र मांढरे आदी उपस्तीत होते.
मागील १३ वर्षा पासून सदर पालखी सोहळा आयोजित करत असताना व्यसन मुक्ती,सार्वजनिक वाचनालय,गुणवंत विद्यार्थी गौरव, स्पर्धा परीक्षा यासाठी’ सहकार्य आदी उपक्रम पालखी सोहळ्यास जोडीला घेत असतो या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हा संकल्प पूर्ण व्हावा म्हणून हजारो भक्तासमवेत  साई चरणी प्रार्थना करणार असल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.
पालखी सोहळ्यात वासुदेवाची भूमिका करणारे राजेंद्र साळुंखे, पुजारी हरिभाऊ केदारी, हरीभाऊ गोंडे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळे यांनी तर उपस्थितांचे आभार मांढरे यांनी केले .

You may have missed

error: Content is protected !!