घरगुती भांडण आणि चक्क “जाऊबाई चावली”
बारामती : आपण अनेक प्रकारची भांडणे पाहली आणि एकली असतील मात्र बारामतीत घरातली भांडणे पोलिस ठाण्यात गेली तेही चक्क जाऊबाई चावली या कारणावरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मानवी जीवनमानत शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन जावांची भांडणे नवी नाहीत, मात्र या जाऊबाईच्या भांडणाची चर्चा गावभर आहे. त्याचे कारणही तसेच आहे कारण पिशवी झटकताना धुळ उडाली आणि अपेक्षेप्रमाणे दोन सख्या जावा एकमेकींना भिडल्या मग काय ? लाढाई ठरलेलीच.. त्या भांडणातून एक जाऊ दुसऱ्या जावेला चावली आणि चक्क जाऊ बाई चावली या कारणावरून गुन्हाही दाखल झाला. मात्र या किरकोळ धुळीमुळे ते घरच धुळ खाणार हे मात्र नक्की असले तरी त्या भांडणाचे लोट मात्र पोलिस ठाण्यात गेले आणि जाऊबाई चावल्याचा एकदाचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
