स्मशानातल्या राखेवरून आणि लाकडावरून खुनाचा गुन्हा उघडकीस

बारामती : स्मशानातल्या जळालेल्या हाडांच्या राखेवरून आणि लाकडावरून वालचंदनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणित दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर हाकीकात अशी की, वालचंदनगर पोलीस ठाणेच्या हद्दीमधील तावशी (ता.इंदापूर ) येथील स्मशानभूमी मध्ये अज्ञात व्यक्तीच्या जळालेल्या खुनाचा तपास लाकडावरून व हाडाच्या राखेवरून तपास लावून खून करणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी दादासाहेब मारुती हरिहर (वय 30) विशाल सदाशिव खिलारे (वय 23, दोघेही रा. गोखळी ता. फलटण जि.सातारा) यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी हरिभाऊ धुराजी जगताप (वय 74., रा. गंगाखेड जि. परभणी ) या व्यक्तीचा खून करून तावशी ता. फलटण येथे पुरावा नष्ट करण्यासाठी स्मशानात मृतदेह जाळला होता या प्रकरणी मृत जगताप यांच्या मुलाने वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
हरिभाऊ जगताप यांचा खून हा आरोपीच्या पत्नीची छेड काढण्याच्या कारणांतून केला होता. हरिभाऊ जगताप व दादासाहेब हरिहर हे एकमेकांचे ओळखीचे होते, नोव्हेंबर रोजी दादासाहेब हरिहर हा जगताप यांच्या गंगाखेड येथील घरी गेल्यानंतर जगताप यांनी हरिहर यांच्या पत्नीवर वाईट नजर ठेवल्याच्या कारणावरून राग मनामध्ये धरून जगताप यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. या खुनांच्या तपासाचे वालचंदनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. मात्र वालचंदनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निवडणुकीच्या काळामध्ये खुनाचे मोठे आव्हान स्वीकारून कुठलाही पुरावा व धागेद्वारे नसताना हे खून प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकाराना गुन्ह्याची माहिती देताना केले.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक, पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक, बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक, अविनाश शिळीमकर,
यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, राजकुमार डुणगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा कुलदीप संकपाळ, पोलीस उप-निरीक्षक मिलींद मिठापल्ली, तसेच सहाय्यक पोलीस फौजदार, बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, गणेश काटकर, अजित थोरात, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे, पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर, यांनी पार पाडली.