अजित दादाच बारामतीचा दादा तर युगेंद्र पवारांचा दारुण पराभव
बारामती : देशाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल समोर आला असून अजित पवारांनी पुन्हा एकदा आपला गड राखण्यात यश मिळवले आहे, अंतिम फेरी अखेरीस अजित पवारांना 1 लाख 81 हजार 132 मते मिळाली आणि युगेंद्र पवार याना 80 हजार 233 मते मिळाली असून निकाला अंती 1 लाख 899 मतांनी अजित पवारांचा विजय झाला. एकूणच अजित दादा हेच बारामतीचे दादा आहेत असे म्हणावे लागणार आहे.
बारामती विधान सभा मतदार संघात एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, नवख्या उमेदवारांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणुकीची रंगत वाढविली असली तरी, निकाला अंती खरी लढत ही उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी झाली तर ही निवडणूक ज्येष्ठ नेते खा. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय असंतोषाच्या वादाची आणि बारामतीचा वारसदार कोण ? हे ठरवणारी होती.
निकालाअंती अजित पवारांना आपला बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले आहे. अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा सख्खा पुतणे युगेंद्र पवार हे होते युगेंद्र पवार यांना 1 लाख 899 या मताधिक्याने अजित पवारांनी पराभूत केले, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका पुतण्यामधील राजकीय लढाईत अजित पवार आणि त्यांचा पुतणे योगेंद्र पवार या काका पुतण्याची प्रत्यक्ष लढाई या निवडणुकीत झाली, त्यात काकाचा विजय झाला.
लोकसभा निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांची पत्नी खा. सुनेत्र पवार यांना उमेदवारी देणे बारामतीकरांना रुचले नव्हते, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडनिकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र तेच बारामतीकर बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार असं बारामतीचे आणि बारामतीकरांचे ठरले होते हेच चित्र या निकालानंतर स्पष्ट झाले.
