बारामतीत विजयावर लागला सट्टा

बारामती : बारामतीत विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा काही तासांवर येऊन ठेपली असताना मतदानानंतर बारामतीची बाजी कोण मारणार यावर बारामतीत विजयाचा सट्टा लागला’ आहे. राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांना देखील निकालाची उत्सुकता लागली आहे.
बारामतीची ही निवडणूक खुद्द पवार घरातच लागली असल्याने कोणता दादा विजयाचा गुलाल लावणार आणि कोण बारामतीत निवडून येणार याबाबत गल्ली-गल्लीत चर्चा सुरु आहे. बारामतीत प्रथमच चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे वेगवेगळे अंदाज तर्क वितर्क लावले जात आहेत. तर बारामतीत कोण विजयी होणार इथ पासून सुरु होवून राज्यात कोणाचे सरकार यावर सट्टा लागला आहे.
बारामतीत पैजा देखील लागल्या आहेत
बारामतीत कोण जिंकणार याची समीकरणे जुळवा-जुळावी करीत वेगवेगळी आकडेवारी लावुन बारामतीकरांनी पैजा देखील लावल्या आहे. अमाका दादा निवडुन आल्यावर पाहिजे त्या हॉटेल पासुन ते तमका दादा निवडुन आल्यावर मी एवढे पैसे देतो अश्या आशयाच्या लाखो रुपयांच्या पैजा लागल्या आहेत.
दोघांनाही खुर्ची
जरी दोघा दादांमध्ये लढाई झाली असली तरी एक दादा निवडून आल्यावर राहिलेल्या दादाला विधानपरिषदेवर संधी मिळणार अशी देखील चर्चा